Jump to content

चौशिंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
चौशिंगा

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: आर्टिओडॅक्टिला
कुळ: बोव्हाइड
उपकुळ: बोव्हाइन
जातकुळी: टेट्रासेरस
जीव: टे. क्वाड्रीकॉर्निस
शास्त्रीय नाव
टेट्रासेरस क्वाड्रीकॉर्निस
ब्लेनविल, १८१६

चौशिंगा (शास्त्रीय नाव : Tetracerus quadricornis ; इंग्लिश: Four-horned Antelope) हे दक्षिण आशियात आढळणारे हरीण आहे. चार शिंगे असली तरी याची वर्गवारी हरीणांच्या कुरंग कुळात होते. खरेतर चार शिंगे हे कुरंग हरीणांचे वैशिष्ट्य नाही परंतु कवटीच्या अभ्यासानंतर पुढील शिंगे ही केवळ कवटीमधील उंचवटे आहेत व मागील दोन शिंगे ही खरी शिंगे आहेत हे सिद्ध होते. तसेच मागील शिंगे ही इतर कुरंग हरीणांप्रमाणेच आहेत.

याचा वावर भारतात सर्वत्र आहे गंगेच्या खोऱ्यापासून ते तमिळनाडू पर्यंत त्याचा आढळ आहे. हे हरीण शुष्क जंगले पसंत करते. याची उंची ५० ते ६० सेमी इतकी असते तर वजन साधारणपणे २० किलो पर्यंत भरते.

चित्रदालन