एस.एस. राजामौली
एस.एस. राजामौली तेलुगू:ఎస్. ఎస్. రాజమౌళి | |
---|---|
आरआरआर चित्रपटाच्या प्रचारादरम्यान | |
जन्म |
कोडुरी श्रीशैला श्री राजामौली[१] १० ऑक्टोबर, १९७३ |
इतर नावे | जक्कण्णा[१] |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र |
|
भाषा | तेलुगू |
पुरस्कार | पद्मश्री (२०१६)[२] |
वडील | के व्ही विजयेंद्र प्रसाद |
पती |
रमा राजामौली (ल. २००१) |
अपत्ये | २ |
धर्म | हिंदू |
कोडुरी श्रीशैला श्री राजामौली उर्फ एस.एस. राजामौली (तेलुगू:ఎస్. ఎస్. రాజమౌళి); (जन्म:१० ऑक्टोबर १९७३) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत जे प्रामुख्याने टॉलीवूड साठी काम करतात.[३] राजामौली हे विशेष करून 'मगधीरा' (२००९), 'बाहुबली: द बिगिनिंग' (२०१५) तसेच 'बाहुबली२: द कन्क्लूजन' सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.[४][५][६]
वैयक्तिक आयुष्य
[संपादन]राजामौली यांचा जन्म १० ऑक्टोबर १९७३ मध्ये सध्याच्या कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील 'मानवी' जवळील 'अमरेश्वरा कॅम्प' येथे झाला.[७] त्यांचे वडील के.व्ही. विजयेंद्र प्रसाद हे एक पटकथा लेखक असून आई राज नंदिनी ह्या एक घरगृहिणी आहेत.[८][९] राजामौली यांचे कुटुंब हे मूळचे आंध्र प्रदेशातील कोव्वूरचे आहे.[१०] त्यांचे प्राथमिक शिक्षण कोव्वूर येथे तर उच्च शिक्षण एलुरू येथे झाले.[११] त्यांची आई विशाखापट्टणम येथील असल्याने येथे त्यांचे वास्तव्य अनेक वर्षे होते.[१२]
राजामौली यांनी २००१ मध्ये रमा राजामौलीशी लग्न केले. रमाने राजामौली यांच्या अनेक चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम केले आहे. राजामौली यांनी रमाचा पहिल्या पती पासून झालेला मुलगा कार्तिकेय याला दत्तक घेतले आहे. या जोडप्याला अजून एक दत्तक मुलगी देखील आहे. कार्तिकेयने तेलुगू अभिनेता जगपती बाबूची भाची पूजा प्रसादशी लग्न केले.[१३][१४]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Here's Why Rajamouli Was Named 'Jakkanna'". Sakshi Post. 28 April 2017.
- ^ "Rajamouli Padma Shri: Latest Rajamouli Padma Shri News, Photos, Videos". movies.ndtv.com.
- ^ "SS Rajamouli on Baahubali 2: Sreemukhi is a big fan of Punch Power A.V.S.R Pandu Ranga RaoThe Conclusion, being an atheist and his love for cinema". Firstpost. 27 April 2017. 1 May 2017 रोजी पाहिले.
- ^ "Dangal and Baahubali won Telestra People's choice award in IFFM Melbourne". 12 August 2017.
- ^ "63rd National Film Awards" (PDF) (Press release). Directorate of Film Festivals. 28 March 2016. 28 March 2016 रोजी पाहिले.
- ^ Dave McNary (2018-06-27). "'Black Panther' Leads Saturn Awards; 'Better Call Saul,' 'Twin Peaks' Top TV Trophies – Variety". Variety.com. 2019-01-09 रोजी पाहिले.
- ^ "TFI And Fans Greet SS Rajamouli On His 46th Birthday". Sakshi Post. 2019-10-10.
- ^ "Baahubali, Bajrangi Bhaijaan: Meet the Rs 500 crore writer". India Today (इंग्रजी भाषेत). 2015-07-20. 22 October 2018 रोजी पाहिले.
- ^ "SS Rajamouli's mother Rajanandini died today". Filmibeat.com (इंग्रजी भाषेत). 20 October 2012. 22 October 2018 रोजी पाहिले.
- ^ "SS Raja Mouli - Telugu Cinema interview - Telugu film director". www.idlebrain.com.
- ^ "SS Rajamouli celebrates his 46th birthday". The Hans India. 10 October 2019.
- ^ Ganguly, Nivedita (13 May 2017). "Vizag holds a special place in my heart: Rajamouli". The Hindu – www.thehindu.com द्वारे.
- ^ Kavirayani, Suresh (11 February 2014). "We are Family". Deccan Chronicle. 11 May 2021 रोजी पाहिले – Pressreader द्वारे.
- ^ "Baahubali director SS Rajamouli's son Karthikeya to marry Pooja Prasad in Jaipur". India Today (इंग्रजी भाषेत). 28 December 2018. 2020-12-04 रोजी पाहिले.