Jump to content

मिथुन (तारकासमूह)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिथुन आधुनिक तारकासमूहातील एक तारकासमूह आणि राशिचक्रातील एक रास आहे. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांच्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता. याला इंग्रजीमध्ये Gemini (जेमिनी) म्हणतात. जेमिनी हा मूळ लॅटिन भाषेतील "जुळे" या अर्थाचा शब्द आहे आणि ग्रीक पुराणकथांतील कॅस्टर आणि पोलक्स यांच्याशी त्याचा संबंध आहे. या तारकासमूहाचे चिन्ह (युनिकोड ♊) आहे.

गुणधर्म

[संपादन]
नुसत्या डोळ्यांनी दिसणारा मिथुन तारकासमूह
मिथुन (मध्यभागी) तारकासमूहाचे ॲनिमेशन. Gemini is associated with the myth of Castor and Polydeuces (also known as Pollux), collectively known as the Dioscuri.[][]

मिथुनच्या पश्चिमेला वृषभ आणि पूर्वेला कर्क, उत्तरेला सारथी आणि गवय तर दक्षिणेला शृंगाश्व आणि लघुलुब्धक तारकासमूह आहेत.

सूर्य दरवर्षी २० मे ते २० जून दरम्यान या तारकासमूहामध्ये असतो.[] फेब्रुवारी महिन्याच्या मध्याच्या सुमारास पूर्व रात्री हा तारकासमूह मध्यमंडलावर येतो. या तारकासमूहाचा मध्य मृगाच्या ईशान्येस होरा ७ तास व क्रांती + २३° येथे आहे. हा तारकासमूह खगोलावरील ५१४ चौ. अंश क्षेत्रफळ व्यापतो.

मिथुन तारकासमूह शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे “V” आकाराचा वृषभ तारकासमूह आणि मृगातील तीन तारे यांच्या पूर्वेला मिथुनमधील कॅस्टर आणि पोलक्स हे दोन तेजस्वी तारे शोधणे.

वैशिष्ट्ये

[संपादन]

तारे

[संपादन]

या तारकासमूहामध्ये नुसत्या डोळ्यांनी दिसणारे ८५ तारे आहेत.[][]

पोलक्स हा मिथुनमधील सर्वात तेजस्वी तारा आहे आणि कॅस्टर हा दुसरा सर्वात तेजस्वी तारा आहे.[7]

α जेम (कॅस्टर): पोलक्स नंतरचा दुसरा सर्वात तेजस्वी तारा. कॅस्टर पृथ्वीपासून ५२ प्रकाश-वर्षे अंतरावर असून तो निळा १.६ दृश्यप्रतीचा तारा आहे.

β जेम (पोलक्स): मिथुनमधील सर्वात तेजस्वी नारंगी राक्षसी तारा पृथ्वीपासून ३४ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे. त्याची दृश्यप्रत १.२ आहे. पोलक्सभोवती एक परग्रह परिभ्रमण करत आहे. त्याचप्रमाणे मिथुनमधील एचडी ५०५५४ आणि एचडी ५९६८६ या दोन ताऱ्यांभोवतीसुद्धा परग्रह आहेत.

γ जेम (अल्हेना): हा पृथ्वीपासून १०५ प्रकाश-वर्षे अंतरावरील १.९ दृश्यप्रतीचा निळ्या-पांढऱ्या रंगाचा तारा आहे.

δ जेम (वसात): हा पृथ्वीपासून ५९ प्रकाशव-वर्षे अंतरावरील द्वैती तारा आहे. प्रमुख तारा ३.५ दृश्यप्रतीचा पांढरा ता आहे आणि दुय्यम तारा ८.२ दृश्यप्रतीचा नारंगी बटूतारा आहे. या ताऱ्यांचा आवर्तीकाल १००० वर्षांपेक्षा जास्त आहे.

ε जेम (मेब्सूता): हा एक द्वैती तारा आहे. मुख्य तारा ३.१ दृश्यप्रतीचा पिवळा महाराक्षसी तारा आहे. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर ९०० प्रकाश-वर्षे आहे. दुसऱ्या ताऱ्याची दृश्यप्रत ९.२ आहे.[7]

ζ जेम (मेक्बुडा): एक द्वैती तारा आहे. मुख्य तारा १०.२ दिवस आवर्तीकाल असणारा चलतारा आहे. त्याची दृश्यप्रत ४.२ ते ३.६ यादरम्यान बदलते. तो एक पिवळा महाराक्षसी तारा असून पृथ्वीपासून १२०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. त्याची त्रिज्या सूर्याच्या ६० पट आहे, म्हणजे तो तारा सूर्यापेक्षा अंदाजे २,२०,००० पट मोठा आहे. दुसरा तारा ७.६ दृश्यप्रतीचा तारा अहे.

η जेम (प्रोपस): हा एक द्वैती तारा आहे. तो ३५० प्रकाशवर्षे अंतरावर असून त्यांचा आवर्तीकाळ ५०० वर्षे आहे. प्रमुख तारा लाल राक्षसी चलतारा आहे ज्याचा आवर्तीकाळ २३३ दिवस आहे. त्याची दृश्यप्रत या काळात ३.९ ते ३.१ यादरम्यान बदलते. दुसऱ्या ताऱ्याची दृश्यप्रत ६ आहे.[7]

दूर अंतराळातील वस्तू

[संपादन]
मेड्यूसा तेजोमेघ.[]

मिथुन आकाशगंगेपासून लांब असल्याने त्याच्यामध्ये दूर अंतराळातील वस्तू तुलनेने कमी आहेत. एस्किमो तेजोमेघ, मेड्यूसा तेजोमेघएम३५ आणि जेमिंगा इत्यादी काही प्रसिद्ध गोष्टी आहेत. एस्किमो आणि मेड्यूसा तेजोमेघ पृथ्वीपासून अनुक्रमे २,८७० आणि १,५०० प्रकाशवर्षे अंतरावरील ग्रहीय तेजोमेघ आहेत. एम५३ एक खुला तारकागुच्छ आहे आणि जेमिंगा पृथ्वीपासून ५५० प्रकाशवर्षे अंतरावरील एक न्यूट्रॉन तारा आहे. एनजीसी २१२९, एनजीसी २१५८, एनजीसी २२६६, एनजीसी २३३१, एनजीसी २३५५ आणि एनजीसी २३९५ या इतर वस्तू आहेत.

एम३५ (एनजीसी २१६८) हा ५ दृश्यप्रतीचा मोठा, लांब खुला तारकागुच्छ आहे. त्याचे खगोलावरील क्षेत्रफळ ०.२ चौ.अंश म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राएवढे आहे. अंधाऱ्या रात्री याला नुसत्या डोळ्यांनी पाहता येऊ शकते. एम३५ पृथ्वीपासून २८०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. [7]

एस्किमो तेजोमेघ (एनजीसी २३९२) एक ग्रहीय तेजोमेघ आहे. त्याची दृश्यप्रत ९.२ आहे आणि तो पृथ्वीपासून ४००० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.[10] [7]

उल्का वर्षाव

[संपादन]

जेमिनिड्स हा एक प्रमुख, तेजस्वी उल्का वर्षाव आहे. याचा उच्च बिंदू १३-१४ डिसेंबरला असतो. त्याचा सर्वाधिक दर अंदाजे १०० उल्का प्रति तास आहे.[7]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ K12.mi.us
  2. ^ Constellation drawings (often but not always) following "The Stars - A new way to see them", H.A. Rey, 1952–1980, ISBN 0-395-24830-2.
  3. ^ Zodiac#Table of dates
  4. ^ E H Burritt - The geography of the heavens and class book of astronomy: Accompanied by a celestial atlas Huntington, 1840 Retrieved 2012-06-25
  5. ^ E ColbertAstronomy without a telescope: being a guide-book to the visible heavens, with all necessary maps and illustrations George & C.W. Sherwood, 1869 Retrieved 2012-06-27
  6. ^ "The Dreadful Beauty of Medusa".